’नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन   

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अ‍ॅकॅडमी  यांच्या पुढाकारातून पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी नीटची परिक्षा देणार्‍या व पूर्व तयारी करणार्‍यांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन आणि सराव पेपर देण्यात येणार आहे.पुणे शहरात नीट परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अभ्यासावर भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते. 
 
गुणवत्ता असूनही पैशाअभावी हे विद्यार्थी मागे पडू नयेत या उद्देशाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून पुणे शहरातील नीटची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मोफत उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी यांनी हात पुढे केला आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी प्रवासात सारथी म्हणून काम करेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पाच सराव प्रश्नपत्रिका, सविस्तर उत्तरांसह ुुु.रिार.ले.ळप या वेबसाइटवर नोंदणी करून विद्यार्थ्यांना या सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. १३ एप्रिल पासून विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर नोंदणी करता येईल. असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीच्या पुणे संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी केले.

Related Articles